भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना अर्ज स्विकारण्यासाठी गुरूवार दि.31 पर्यंत मुदतवाढ


              अकोला,दि.23 (जिमाका)-  शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून घेणेसाठी रोख रक्कम त्यांच्या आधार संलग्न खात्यात जमा करणेबाबतची '' भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत विद्यार्थ्यांकडून समक्ष / टपालव्दारे अर्ज स्वीकृत करण्यासाठीची  गुरूवार (दि. 31) पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
            या योजनेसाठी अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 10 वी, 12 वी, पदवी ,पदविका परिक्षेमध्ये 50 टक्के पेक्षा जास्ता गुण अनिवार्य आहे.  दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता टक्केवारीची मर्यांदी 40 टक्के आहे.  योजनेचा लाभ घेणे करिता विद्यार्थी हा अभ्यासक्रमाचे प्रथम वर्षाला असणे अनिवार्य असणे आवश्यक आहे. (उदा. इयत्ता 11 वी, पदवी / पदविका प्रथम वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ देता येईल.) 
              या योजनेकरिता अर्ज सादर करण्याची यापुर्वीची शेवटची तारीख 30 सप्टेंबर  होती. अर्ज स्वीकारण्याची मुदत गुरूवार (दि. 31) पर्यंत वाढविण्यात येत आहे.
              योजेनसंदर्भात अधिक माहितीकरिता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, अकोला कार्यालय, जिल्हाधिकारी, कार्यालय, परिसार प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, अकोला येथे दुरध्वनी क्रमांक  0724-2426438 वर संपर्क साधावा,असे समाज कल्याण  विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ