नोंदणी व मुद्रांक विभागाचे १५ रोजी अभियान


             अकोला,दि.१०(जिमाका)- नोंदणी व मुद्रांक विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा आणि त्यातील सुधारणा याबाबत जनतेला माहिती व्हावी यासाठी  मंगळवार दि.१५ रोजी विशेष अभियान राबविण्यात येणार आहे, असे सह जिल्हा निबंधक वर्ग १ डी.एस. भोसले यांनी कळविले आहे.
सेवांची अंमलबजावणी आणि दुसरीकडे या सेवांविषयी नागरीकांमध्ये असलेली अनभिज्ञता यातील अंतर भरुन काढण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. नोंदणी व मुद्रांक विभाग प्रमुख नोंदणी महानिरिक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य पुणे अनिल कवडे तसेच नोंदणी उपमहानिरिक्षक अमरावती मोहन जोशी यांनी विशेष अभियान राबविण्याबाबत अधिनस्त कार्यालयांना निर्देश दिले असुन त्या अंतर्गत अकोला येथे  मंगळवार दिनांक १५ रोजी सकाळी दहा वाजता स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नोंदणी व मुद्रांक प्रशासकीय भवन  येथे हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमास अकोला व वाशिम जिल्ह्यातील विधीज्ञ, बॅंक अधिकारी, वास्तुविशारद तथा कामकाजाशी संबंध असलेल्या नागरी समुहातील नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन  सह जिल्हा निबंधक वर्ग १ अकोला डि.एस.भोसले तसेच सह जिल्हा निबंधक वर्ग- वाशिम के.ए. मगर यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ