जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे कुस्तीगिर राज्यस्तरीय स्पर्धेत

     अकोला,दि.१०(जिमाका) – क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला व्दारा संचलित जिल्हा कुस्ती प्रशिक्षण  केंद्र वसंत देसाई  स्टेडियम,  अकोला येथील कुस्तीगिरांनी  अमरावती येथे झालेल्या  शालेय विभागीय   कुस्ती स्पर्धा मध्ये नेत्रदिप कामगिरी केली आहे. या  स्पर्धा मध्ये १७ वर्ष वयोगटात ग्रीकोरोमन या प्रकारामध्ये ४५  किलो मध्ये  तनय तुषार  उज्जैनकर, ७१किलो मध्ये हरीश अमिन मांजरे, ८० किलो मध्ये आदित्य अनिल दामोदर  , १९ वर्ष  वयोगटात ७२ किलो मध्ये  आदित्य  लक्ष्मीशंकर यादव,  कुस्ती फ्रि- स्टाईल  या प्रकारात ७९ किलो मध्ये साकेत  सुरेंद्र सिरसाट, ९२किलो मध्ये शहजाद हुसैन, ९७ किलो मध्ये हितेश प्रदिप मसेन या सर्व  मल्‍ल कुस्तीगीर यांनी विभागीय  कुस्ती स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांक मिळविले. सर्वांची पुणे येथे आयोजित राज्यस्तर शालेय कुस्ती स्पर्धा करीता सर्वांची निवड झाली आहे.  सर्व कुस्तीगिरांना  आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक लक्ष्मीशंकर  यादव यांचे मार्गदर्शनाखाली सराव करतात. तसेच अनिल कांबळे, मो. शेरा यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभले आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ