कामगारांचे १०० टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करा


संघटना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत आवाहन
अकोला,दि.(जिमाका)- विधानसभा निवडणूक २०१९ करीता अकोला जिल्ह्यातील कामगारांचे  १०० टक्के मतदान व्हावे यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन कामगार संघटना    अधिकारी यांच्या संयुक्त  बैठकीत आज  करण्यात आले.
या संदर्भात  आज दिव्यांग कक्ष येथे  बैठक  झाली. बैठकीस  जिल्हा समाज कल्याण अधिकारी रा.स. वसतकार, सहाय्यक कामगार  आयुक्त  जी. आर. नालिंदे, कामगार अधिकारी  तसेच जिल्ह्यातील   विविध कामगार   संघटनांचे  पदाधिकारी , सेवा  निवृत्त कर्मचारी संघटनांचे  पदाधिकारी    उपस्थित होते.   या बैठकीत  आवाहन  करण्यात आले की, सर्व संघटनांनी   आपआपल्या  सर्व सभासदांना  दि.२१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या  विधानसभा निवडणूकीत  मतदान करण्याचे आवाहन करावे व १०० % मतदान होईल यासाठी प्रयत्न करावे. मतदानाच्या दिवशी मतदान  करता यावे  यासाठी सर्व  कामगारांना  सुटी देण्याचे आदेश शासनाने निर्गमीत केले आहेत. कामगार संघटनांनी यानुसार कार्यवाही करण्याबाबत आपआपल्या आस्थापनांकडे आग्रही असावे. मतदानाच्या दिवशी  आस्थापना दुकाने व अन्य  व्यावसायिक यांनी सकाळी  सात ते सायं सहा वाजेपर्यंत  व्यवस्था बंद ठेवून कामागारांना मतदानासाठी प्रोत्साहित  करावे. मनपा घंटागाडीवरून, आकाशवाणीवरून याबाबत संदेश प्रस्तावित करण्यात यावा अशा सुचना  यावेळी करण्यात आल्या.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ