स्वेच्छा रक्तदान दिनानिमित्त रक्तदात्यांचा सत्कार

अकोला,दि.१८ (जिमाका)- राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिनाचे (दि.१ ऑक्टोबर) औचित्य साधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जिल्हा रक्त पेढीत आज रक्तदान शिबिर व रांगोळी स्पर्धा पार पडली. यावेळी या समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. शिवहरी घोरपडे, मा. अधिष्टाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला डॉ. कुसुमाकर घोरपडे, उपअधिष्ठाता डॉ. प्रदीप उमप, प्राध्यापक व विभाग प्रमुख विकृत्ती शास्त्रविभाग, सहयोगी प्राध्यापक डॉ. दिलीप सराटे, डॉ. शामकुमार सिरसाम, वैद्यकीय अधीक्षक डॉ. नैताम, उपवैद्यकीय अधीक्षकसंजीव देशमुख, प्रशासकीय अधिकारी रक्तपेढी प्रमुख डॉ. श्रीराम चोपडे, अधिसेविका ग्रेसी मरियम, डॉ. सुवर्णा पाटील, डॉ. जूनगरे आदी उपस्थित होते.
राज्य रक्त संक्रमण  परिषद  व म.रा.ए.नि.सं. मुंबई यांच्या  निर्देशानुसार रक्तदानाची गरज व महत्व सांगण्यासाठी एक ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस म्हणून  साजरा करण्यात येतो.  या वर्षाकरीता घोष वाक्य Atleast donate once in lifetime हे आहे. सर्व सामान्य नागरिकांमध्ये रक्तदान,  सुरक्षित रक्त व रक्तघटक   याबद्दल  जनजागृती करणे , अत्यावश्यक परिस्थितीत रक्तदान करून  रूग्णांचे  प्राण  वाचविणाऱ्या रक्तदात्यांचे  व रक्तदान शिबीर आयोजक यांचे आभार  मानणे,  रक्तदात्यांचे  आभार मानणे व रक्तदान न करणाऱ्या व्यक्तींना  प्रोत्साहित करणे,  रक्तदानाबद्दल जनजागृती करणे, वर्षातून तीन वेळा स्वैच्छिक रक्तदानाचे महत्व पटवून देणे   हे आयोजनाचे उद्दिष्ट आहे. त्यानिमित्ताने        या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.प्रास्ताविक डॉ. श्रीराम चोपडे व सूत्रसंचालन श्रीमती शिल्पा तायडे, श्रीमती विद्या कव्हळे यांनी केले. यावेळी १२२ रक्तदान शिबीर आयोजकांचा सत्कार करण्यात आला. डॉ. अनिकेत काकडे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. आशिष शिंदे, डॉ.तपस्या भारती, डॉ. अनिकेत काकडे, डॉ. कपिल महाजन, डॉ. स्वाती कलंत्री, डॉ. अस्मिता अकर्ते, श्री. रेलकर, श्री. ठाकरे, श्री. मातुरकर, श्री. गणेशपुरे, श्री. खोद्रे, श्रीमती पिंपरकर, श्री. कुरतवाढ, श्री. अनिल जाधव, श्री. संतोष शीरसाट, श्री. रुपेश तायडे, श्री. चंदन शिवे, श्री. गौरव औतकर, श्री. अंकुश जामधाळे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ