अकोला जिल्हयात महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये आदेश जारी



        अकोला, दि. 30:- दि. 10 नोव्हेबर 2019 (एक दिवस मागेपुढे) मुस्लीम बांधवाचे वतीने ईद-ए- मिलादुन नबी उत्सव साजरा करण्यात येणार आहेत.
            उत्सव, कार्यक्रमाचे दरम्यान जिल्हयात  शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी  जिल्हा पोलीस अधिक्षक अकोला यांना कलम 36 मुंबई पोलीस कायदया नुसार प्राप्त असलेल्या अधिकारान्वये अकोला जिल्ह्यातील सर्व पोलीस फौजदार व त्यापेक्षा वरीष्ठ अधिकारी यांना दि. 31 ऑक्टोबर2019  चे 00.00 वा. पासुन ते दि.13 नोव्हेबर 2019  चे 24.00 वाजेपर्यंत खालील अधिकार प्रदान करीत आहे.
            रस्त्यावरुन जाणा-या मिरवणुकीतील किंवा जमावातील लोक कशा रितीने चालतील त्यांची वर्तणुक कशी असावी ?  याविषयी निर्देश देणे, मिरवणुकीच्या व जमावाच्या प्रसंगी उपासनेच्या सर्व जागेचे आसपास, उपासनेच्या वेळी व कोणत्याही रस्त्याने किंवा सार्वजनिक जागी किंवा लोकांच्या एकत्र जमण्याच्या जागी  गर्दी होणार असेल किंवा अडथळा निर्माण होण्याचा संभव असेल अशा सर्व प्रसंगी अडथळा होवू न देणे, अशा कोणत्याही मिरवणुका ज्या मार्गाने जाव्यात किंवा ज्या मार्गाने जावू नयेत ते ‍ विहीत करणे, सर्व रस्त्यावर व नदयांचे घाटावर आणि सार्वजनिक स्नानाचे, कपडे धुण्याचे, उतरण्याचे ठिकाणी जागेमध्ये देवालय किंवा इतर सार्वजनिक किंवा जागेत किंवा जागेजवळ वाद्य वाजविण्याचे किंवा गाण्याचे किंवा ढोल ताशे, शिट्टया व इतर कर्कश वाद्य वाजविणे वगैरे बाबत नियम तयार करणे व त्यावर नियंत्रण ठेवणे, कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा सार्वजनिक उपहाराच्या (अतिथी गृहाच्या) जागेत, ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकर) उपयोग करण्याचे नियम करणे व त्यावर नियंत्रण करणे, सक्षम अधिका-यांनी हया अधिनियमांचे कलम 33, 36, 37 ते 40, 42, 43 व 45 अन्वये केलेल्या कोणत्याही आदेशास अधीन असलेले व त्यास पुष्टी देणारे योग्य आदेश देणे.
            वरील आदेशाचे कोणत्याही इसमाने कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलीस अधिनियम कलम 134 प्रमाणे शिक्षेस प्रात्र राहील, असे अमोघ गावकर, पोलीस अधिक्षक, अकोला यांनी कळविले आहे.
  0000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम