मतदानाच्या दिवशी कारखान्यात काम करणा-या कामागारांना भरपगारी सुट्टी



अकोला,दि.16 (जिमाका) -   अकोला  बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि अमरावती मतदार संघासाठी भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक- 2019 चा  कार्यक्रम घोषित केला असुन निवडणूक येत्या सोमवार 21 रोजी घेण्यात येणार आहे.
निवडणूकीच्या दिवशी म्हणजेच  सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी त्या  त्या  विधानसभा मतदार संघामध्ये  सार्वजनिक व खाजगी  औद्योगीक उपक्रम, कारखान्यामध्ये काम करणा-या कामगारांना/कर्मचा-यांना लोकप्रतिनीधी अधिनियम 1951 च्या कलम 135 बी अन्वये मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी भरपगारी रजा म्हणुन सुट्टी जाहिर करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पुर्ण दिवस सुट्टी देणे शक्य  नसेल तर मतदान  क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी दोन ते तीन तासांची   सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी  संबंधीत महानगरपालीका आयुक्त अथवा  जिल्हाधिकारी यांची  पुर्व परवानगी घेणे आवश्यक राहील.
या आदेशाचे पालन करावे असे आवाहन औद्योगीक सुरक्षा व आरोग्य विभागाचे प्रभारी सह संचालक वि. वा.  निकोले,  यांनी केले आहे.
00000



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ