३०-अकोला (पश्चिम) मतदार संघातील उमेदवारांच्या खर्च तपासणीचे वेळापत्रक जाहीर


अकोला,दि.९(जिमाका)- ३०-अकोला (पश्चिम) मतदार संघा करीता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी  केलेल्या खर्चाची तपासणी गुरुवार दि. १०,सोमवार दि. १४ व शनिवार दि.१९ रोजी होणार आहे. ही तपासणी करण्यासाठी खर्च निरिक्षक संदीप लाकरा हे निश्चित केलेल्या वेळेत ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्यासाठी त्यांनी वेळापत्रक जाहीर केले आहे.
या खर्च तपासणीसाठी निरीक्षक संदीप लाकरा हे उद्या गुरूवार दि.१० तसेच सोमवार  दि.१४ व शनिवार दि.१९ रोजी  सकाळी १० ते  दुपारी साडेबारा या कालावधीत  लोकशाही सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व संबंधित उमेदवारांनी किंवा  त्यांनी  खर्चासाठी नियुक्त  केलेल्या  प्रतिनिधींनी  यावेळी खर्चासंबधीची सर्व लेखे अद्यावत करून तपासणीसाठी  न चुकता हजर  रहावे, असे निवडणूक निर्णय अधिकारी ३०- अकोला (पश्चिम) मतदारसंघ, अकोला यांनी कळविले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ