7 रोजी (अकोट) व 9 रोजी (अकोट वगळून) मद्यविक्री बंद

अकोला,दि.4 (जिमाका)- अकोला जिल्हा व अकोट शहर येथे नवदुर्गा विसर्जन दिनी म्हणजेच दि. 7 (अकोट),          दि. 9 (अकोला जिल्हाः अकोट शहर वगळून) मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.
अकोट शहरात सोमवार दि. 7 रोजी नवदुर्गा मिरवणुक व विसर्जन होणार आहे. त्यामुळे दि. 7 रोजी अकोट शहरातील सर्व मद्य विक्री बंद राहील. अकोला जिल्ह्यातील भागात (अकोट शहर वगळुन) बुधवारी दि. 9 रोजी संपुर्ण दिवस मद्यविक्री बंद राहील, असे या आदेशात म्हटले आहे. तसेच या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन