स्वेच्छा रक्तदान दिनः शासकीय रक्तपेढीत आज रक्तदान शिबिर व रांगोळी स्पर्धा


अकोला,दि.१७ (जिमाका)- राष्ट्रीय स्वेच्छा रक्तदान दिनाचे (दि.१ ऑक्टोबर) औचित्य साधून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जिल्हा रक्त पेढीत शुक्रवार दि.१८ रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान शिबिर व रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्य रक्त संक्रमण  परिषद  व म.रा.ए.नि.सं. मुंबई यांच्या  निर्देशानुसार रक्तदानाची गरज व महत्व सांगण्यासाठी एक ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस म्हणून  साजरा करण्यात येतो.  या वर्षाकरीता घोष वाक्य Atleast donate once in lifetime हे आहे.
सर्व सामान्य नागरिकांमध्ये रक्तदान,  सुरक्षित रक्त व रक्तघटक   याबद्दल  जनजागृती करणे , अत्यावश्यक परिस्थितीत रक्तदान करून  रूग्णांचे  प्राण  वाचविणाऱ्या रक्तदात्यांचे  व रक्तदान शिबीर आयोजक यांचे आभार  मानणे,  रक्तदात्यांचे  आभार मानणे व रक्तदान न करणाऱ्या व्यक्तींना  प्रोत्साहित करणे,  रक्तदानाबद्दल जनजागृती करणे, वर्षातून तीन वेळा स्वैच्छिक रक्तदानाचे महत्व पटवून देणे   हे आयोजनाचे उद्दिष्ट आहे. त्यानिमित्ताने   जिल्हा शासकीय रक्तपेढी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला तर्फे रांगोळी स्पर्धा व रक्तदान  शिबीर   कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 हा सोहळा शुक्रवार दि.१८ सकाळी दहा वाजता अधिष्ठाता कार्यालय जवळील हॉल येथे  होणार आहे.  या कार्यक्रमास जिल्ह्यातील रक्तदाते, रक्तदान चळवळीतील कार्यकर्ते आदींनी उपस्थित रहावे, तसेच नागरिकांनी   शासकीय रक्तपेढीस प्राधान्याने रक्तदान करावे असे आवाहन  महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे, उपअधिष्ठाता डॉ. कुसूमाकर घोरपडे, विभागप्रमुख डॉ. प्रदीप उपम, सह प्राध्या. डॉ. दिलीप सराटे व रक्तपेढी प्रमुख डॉ. श्रीराम चोपडे,  डॉ. आशिष शिंदे व  डॉ. तपस्या भारती यांनी केले आहे.
०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ