मातंग जातीतील होतकरू तरूणाच्या गटास बॅण्ड साहित्याचे वाटप



अकोला, दि.30 (जिमाका)-   सध्या सुरू असलेले आर्थ‍िक वर्ष हे अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे होत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील तरूण मातंग व त्यांच्या  पोटजातीतील होतकरू तरूण गटास बॅण्ड साहित्‍य वितरण  करण्याचे मुख्यालयाने  निश्चित केले आहे. 
तरी जिल्ह्यातील तरूण गटांनी  आपल्या  साहित्य मागणी साठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास  महामंडळ  जिल्हा कार्यालय अकोला, हिंगणा फाटा, आरोग्य नगर अकोला येथे दि. 11 नोव्हेंबर पर्यंत रितसर अर्ज जिल्हा व्यवस्थापक यांच्याकडे करावा,असे जिल्हा व्यवस्थापक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास  महामंडळ  अकोला यांनी कळविले आहे.
00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना