प्रधानमंत्री पीक विमा योजना;नुकसान भरपाई निश्चितीसाठी संयुक्त समिती
अकोला दि.८(जिमाका)- प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत हवामानातील प्रतिकूल परिस्थिती (mid season adversity) करिता खालीलप्रमाणे पीक नुकसान सर्वेक्षणाकरिता संयुक्त समिती गठित करण्यात आली आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कळविले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेश जारी केले आहेत. त्यानुसार,
समितीचे स्वरुप- अध्यक्ष-संबंधित मंडळाचे मंडळ अधिकारी, सदस्य
सचिव-मंडळ कृषी अधिकारी सदस्य-कृषि विस्तार अधिकारी/कृषि अधिकारी (पंचायत समिती),
विमा प्रतिनिधी,शेतकरी प्रतिनिधी या प्रमाणे. या समितीने मार्गदर्शक सुचनेनुसार सर्वेक्षण करून त्वरीत
अहवाल सादर करावा,असे निर्देशही जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा