पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम घोषीत; 1 ऑक्टोबरपासून नोंदणी सुरु


अकोला,दि.29(जिमाका)- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार अमरावती पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम 1 ऑक्टोबरपासून सुरु होत आहे. त्यानअुषंगाने जिल्ह्यातील सर्व पात्र पदवीधर मतदारांनी संबधित तहसिल कार्यालय व पदनिर्देशीत ठिकाणी नोंदणीसाठी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निमा अरोरा यांनी केले.

पुनरिक्षण कार्यक्रम याप्रमाणे:  मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (3) अन्वये जाहीर सूचना प्रसिध्दी शनिवार   दि. 1 ऑक्टोबरला होईल. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (4) अन्वये वर्तमानपत्रातील नोटीसची प्रथम पुन:प्रसिध्दी शनिवार, दि. 15 ऑक्टोबर रोजी, तर वर्तमानपत्रातील नोटीसची व्दितीय पुन:प्रसिध्दी मंगळवार, दि. 25 ऑक्टोबरला करण्यात येईल. नमुना 18 किंवा 19 व्दारे दावे व हरकती स्विकारण्याचा अंतिम सोमवार दि. 7 नोव्हेंबर राहील. जुना नमुना स्वीकारला जाणार नाही.  हस्तलिखिते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई शनिवार, दि. 19 नोव्हेंबर तर प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी बुधवार, दि. 23 नोव्हेंबर रोजी करण्यात येईल. दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी हा बुधवार, दि. 23 नोव्हेंबर  ते शुक्रवार दि. 9 डिसेंबर पर्यंत राहील. दावे व हरकती निकाली काढणे, पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे याची अंतिम मुदत रविवार, दि. 25 डिसेंबर आहे. तर मतदार यादीची अंतिम प्रसिध्द शुक्रवार, दि. 30 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येईल.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ