आयटीआय अकोला (मुलींची)येथे 'कौशल्य दीक्षांत' समारंभ

 







अकोला, दि.१८(जिमाका)-  शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला (मुलींची )येथे २०२२ वर्षी उत्तीर्ण झालेल्या राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र परीक्षेतील  प्रशिक्षणार्थिनी यांचा   'कौशल्य दीक्षांत समारंभ' शनिवारी (दि.१७) पार पडला.

संस्था व्यवस्थापन समिती अकोलाचे अध्यक्ष जयंत पडगिलवार हे या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी तथा उद्घाटक म्हणून उपस्थित होते . कौशल्य दीक्षांत सोहळ्याचे अध्यक्ष म्हणून अकोल्याचे जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी  प्रकाश जयस्वाल हे होते. तर उद्योजक कांतीलाल गोरसिया, मनोज खंडेलवाल, उन्मेष मालू ,गणेश देशमुख तसेच कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त अकोला दत्तात्रय ठाकरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला (मुलींची) येथे असलेल्या फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजीच्या या व्यवसायाच्या जया अवातिरक  राज्यातून प्रथम,आसीया परवीन राज्यातून द्वितीय,शूमायला खान राज्यातून तृतीय,वैष्णवी अवातिरक राज्यातून तृतीय,सोनाली ठाकरे राज्यातून तृतीय,सविता कांबळे राज्यातून चौथी ,तसेच ड्रेस मेकिंग व्यवसायाची रोहिणी इंगळे  राज्यातून पाचवी आली.त्यांचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थिनींचे पालक व निदेशिक निवेदिता माणिकराव व सोनल कुलकर्णी यांचीही यावेळी उपस्थिती होती. त्यानंतर प्रत्येक व्यवसायात प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या प्रशिक्षणार्थींनी यांचा त्यांच्या पालक व निदेशक यांच्या समवेत स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन  गौरव करण्यात आला.

सोहळ्याची सुरुवात प्रमुख अतिथींच्या  हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आली.प्रास्ताविक व बीज भाषण संस्थेचे प्राचार्य राम मुळे यांनी केले. परिचय  निलेश पन्हाळकर  यांनी करून दिला. आभार प्रदर्शन संस्थेचे प्रभारी गट निदेशक प्रशांत बोकाडे यांनी केले व राष्ट्रगीताने कौशल्य दीक्षांत समारंभाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद पोहरकर व सोनाली कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता संस्थेच्या गट निदेशिका रेखा रोडगे, प्रभारी गटनिदेशक प्रशांत बोकाडे, ज्येष्ठ निदेशक भालचंद्र दिगंबर, अरविंद पोहरकर, शुभांगी गोपणारायन, एन. पी. पन्हाळकर,सुभाष निंभोकार , लक्ष्मण जठाळ ,सौ. मनोरमा   भारसाकळे, सौ. वीणा लाड, निवेदिता माणीकराव,  सोनल कुलकर्णी, पी.जी. दांगटे,  बी.एस. बोदडे,  मयुरी बासोडे , कुमारी खोब्रागडे  व इतर सर्व कर्मचारी वृंद  यांनी परिश्रम घेतले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ