सेवा पंधरवाडा; तृतीयपंथी नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र शिबीर


अकोला, दि.21(जिमाका)- राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा  दि. 17 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या कालावधीत तृतीयपंथी यांना नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करुन देण्यासाठी विशेष शिबीरांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथीयानी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले  आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे तृतीयपंथीयांच्या कल्याण व त्यांच्या हक्कासाठी तृतीयपंथीय हक्क संरक्षण आणि  कल्याण मंडळ स्थापन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा व त्यांच्या तक्रारी निवारण करता यावे या करीता शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. याकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, निमवाडी, पोलीस वसाहत जवळ, अकोला  येथे प्रत्यक्ष नोंदणी करावी. अथवा  http://transgender.dosje.gov.in  या पोर्टलवर नोंदणी करावी. नोंदणीकरीता लागणारी आवश्यक कागदपत्राची माहिती पोर्टलवर देण्यात आली आहे. तरी जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांनी नोंदणी अभियानास उत्स्फुर्त सहभाग घ्यावा, असे आवाहण करण्यात येत आहे.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम