खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या विविध योजनांच्या जनजागृतीसाठी मेळावे

 अकोला, दि.१९(जिमाका)-  खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. त्यातून उद्योग व व्यवसाय उभारणीसाठी कर्ज उपलब्ध करुन दिले जाते. या शासकीय योजनांची माहिती नागरिकांना व्हावी यासाठी जनजागृती मेळावे आयोजीत करण्यात आले आहे. त्यात मंगळवार दि.२० निंबा फाटा, ता. बाळापूर, बुधवार दि.२१ रोजी श्रीसंत मिराबाई संस्थान आलेगाव ता. पातूर, शुक्रवार दि.२३ रोजी पंचायत समिती भवन, अकोट, शुक्रवार दि.३० रोजी पंचायत समिती सभागृह, तेल्हारा येथे हे मेळावे सकाळी ११ ते दुपारी तीन या वेळात होणार आहेत. या मेळाव्यांना शेतकरी, उद्योजक, युवक, युवती, महिला यांनी उपस्थित रहावे व लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीमती एन.टी. लवाळे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी श्रीमती एन.टी.लवाळे (८४३२९८९१२३), आर.एम. बिल्बिले, मधुक्षेत्रिक (८६९८०५७०१३) यांचेशी महसुल कॉलनी, शासकीय आयटीआय, अकोला येथे संपर्क साधावा. दुरध्वनी ०७२४-२४१४२५०.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ