सेवा पंधरवाडामध्ये लाभार्थ्यांना दिले घरपोच जात प्रमाणपत्र


अकोला, दि.28(जिमाका)- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या निर्देशानुसार राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा  दि. 17 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मंगळवार दि. 27 सप्टेंबर रोजी शहरातील नाथजोगी समाजाच्या वस्तीमधील कु.तनवी शिंदे, आदित्य निंभारकर, प्रतिक्षा शिंदे व आयुष निंभारकर यांना त्यांच्या घरपोच जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष समीर कुर्तकोटी, सदस्य विजय साळवे, सदस्य सचिव दिपा हेरोळे, दक्षता पथकाच्या पोलीस निरिक्षक शुभांगी कोरडे व नगरसेवक राजेश मिश्रा यांच्या उपस्थितीत करण्यात आले. जात प्रमाणपत्र अंत्यत कमी वेळात व कार्यालयाचे पायदळ न करता घरपोच मिळाल्याबाबत संबधित विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ