औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आज दीक्षांत समारंभ


अकोला,दि.16(जिमाका)- औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची) येथे आज(दि.17) दुपारी दिड वाजता दीक्षांत समारंभ आयोजित केला आहे. या दीक्षांत समारंभामध्ये औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची )अकोला येथून सन 2022 च्या राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रथम तथा द्वितीय वर्षाच्या सर्व यशस्वी प्रशिक्षणार्थींना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहेत.

 समारंभाचे मुख्य अतिथी तथा उद्घाटक औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोला (मुलींची)चे व्यवस्थापन समिती अध्यक्ष जयंत पडगिलवार हे असणार आहेत.  दीक्षांत समारंभाला संस्था व्यवस्थापन समितीचे सदस्य तथा  उद्योजक कांतीलाल गोरासिया, मनोज खंडेलवाल, उन्मेष मालू, गणेश देशमुख  हे प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास दत्तात्रय ठाकरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या कौशल्य दीक्षांत समारंभाचे अध्यक्ष स्थानी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी प्रकाश जयस्वाल राहतील. या कार्यक्रमाला सर्व प्रशिक्षणार्थींनी तसेच आपापल्या व्यवसायात प्रथम आलेल्या प्रशिक्षणार्थीनीने आपल्या पालकांसह  उपस्थित राहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था(मुलींची) चे प्राचार्य राम मुळे यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ