कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत दोन पॉझिटीव्ह, आठ डिस्चार्ज
अकोला दि.22(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 134 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर आठ जणांला डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण
पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.2 व खाजगी 0)2+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 2.
आरटीपीसीआर ‘दोन’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिलांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर व अकोला
महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
आठ डिस्चार्ज
आज दिवसभरात आठ जणांला डिस्चार्ज देण्यात आला, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय रुग्ण ‘35’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65904(49771+15142+991) आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 35 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील तीन रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 32 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा