जिल्हा ग्रंथालय; गुरुवारी(दि.22) महिला सक्षमीकरण जनजागृती रॅली


अकोला, दि.20(जिमाका)- राजा राममोहन रॉय जयंतीनिमित्त जिल्हा ग्रंथालय कार्यालयाव्दारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने गुरुवार दि. 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले असून जिल्हा ग्रंथालय कार्यालयापासून सुरुवात होवून प्रमीलाताई ओक, सार्वजनिक ग्रंथालय, अकोला येथे समारोप होणार आहे. या रॅलीमध्ये शाळेकरी मुले, मुली, शिक्षक, स्थानिक नागरिक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहे. तसेच रॅलीचे उद्घाटन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या हस्ते होणार आहे,  अशी माहिती जिल्हा ग्रंथालय कार्यालयाचे जिल्हा ग्रंथपाल अ.पु. वानखडे यांनी दिली.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ