जिल्ह्यात लंपी चर्म रोगाचे लसीकरण पूर्ण


अकोला दि.24(जिमाका)- लम्पि चर्म रोग हा संसर्गजन्य आजार असून तो ‘गो’ वर्गातील जनावरांचा त्वचा रोग आहे. या आजारांच्या नियत्रंणासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा व मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात लसीकरण मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. या मोहिमेत आतापर्यंत 2 लक्ष 24 हजार 934 जनावरांचे लसीकरण पुर्ण करण्यात आले असून जर कुणाच्या जनावरांचे लसीकरण बाकी राहिले असल्यास त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय रुग्णालयात संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा  पशुसंवर्धन उपायुक्त डॉ .जगदीश बुकतरे यांनी केले आहे .  

जिल्ह्यामध्ये लंपी चर्म रोगाची सुरुवात दि. 18 ऑगस्ट रोजी निपाना या गावामध्ये झाला होता. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये एकूण 2 हजार 998 एवढे बाधित जनावरे असून त्यापैकी 790 जनावरे बरी झालेली आहेत. सद्यास्थितीत लंपी चर्म रोगाचे एकूण 2 हजार 013 सक्रीय रुग्ण आहेत. लंपी रोगाचा प्रादुर्भाव अकोट, तेल्हारा व बाळापुर या तालुक्यामध्ये जास्त प्रमाणा आढळुन येत असून तिथे मर्तुकीचे प्रमाण इतर तालुक्यापेक्षा जास्त आहे. लंपी चर्म रोगाच्या संख्येत वाढ होत असल्याने पशुधनावर योग्य उपचार करून मर्तुकी थांबविणे अत्यंत गरजेचे आहे. रोगाचे क्षेत्रीय निदान होण्यामध्ये अचूकता येण्यासाठी तज्ञ मंडळीच्या सहायताने उपचार करणे चालु आहे. उपचारार्थ अकोला पीजीआयव्हीएएस संस्थेमधील पदव्युत्तर पदवीधारकचे विद्यार्थी व इंटर्न विद्यार्थीची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येक तालुक्यासाठी चमू तयार करण्यात आली आहे. गोचीड गोमाशा निर्मुलन कार्यक्रम ग्रामपंचायतीच्या मदतीने करण्यात येत आहे. अकोला जिल्ह्यामध्ये एकून 2 लक्ष 88 हजार 200 लस प्राप्त झाली असून खाजगी पदवीधारकाच्या मदतीने लसीकरण पुर्ण करण्यात आले आहे. जर कुणाच्या जनावरांचे लंपी चर्म रोगाचे लसीकरण बाकी असेल तर त्यांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा  पशुसंवर्धन विभागाव्दारे करण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ