आदिवासी विभाग; महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविले


          अकोला दि.23 (जिमाका)-   एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पामार्फत भारत सरकार शिष्यवृती अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता शासनाव्दारे विविध   योजना राबविण्यात येतात. या योजनाचा लाभ घेण्यासाठी  विद्यार्थ्यांनी महाडिबीटीच्या संकेतस्थळावर दि. 21 सप्टेंबरपासून सुरु झाली असून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी यांनी केले आहे.

             एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व शासकिय, निमशासकिय, अनुदानित, कायम विना अनुदानित महाविदयालयांना भारत सरकार शिष्यवृती अंतर्गत अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरीता भारत सरकार शिष्यवृती, शिक्षण शुल्क, परिक्षा शुल्क व इतर योजनाकरीता अर्ज करण्यासाठी mahadbtmahait.gov.in ऑनलाईन पोर्टल सुरु केले आहे. त्यानूसार जिल्ह्यातील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असलेल्या अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजना सन 2022-23 या सत्रातील नवीन तथा नुतनीकरण अर्ज तात्काळ mahadbtmahait.gov.in  या प्रणालीवर ऑनलाईन भरण्यात यावे. तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सन 2021 -22 व 2022-23 या वर्षातील महाविद्यालय स्तरावरील विविध कारणास्तव प्रलंबित असलेले अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे नविन अर्ज तसेच नुतनीकरण अर्ज तात्काळ  तुटी पुर्तता करून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अकोला या कार्यालयाच्या लॉगीनला मंजूरीसाठी पाठविण्यात यावे. तसेच विद्यार्थ्यांच्या अर्जाची हॉर्ड कॉपी महाविद्यालय स्तरावर जतन करून ठेवण्यात यावी. अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी विहीत मुदतीत अर्ज भरून महाविद्यालय स्तरावर सादर करावे. यासाठी महाविद्यालयात सुचना फलकावर सुचना लावून वर्गामध्ये नोटीस फिरवावी. अनुसूचित जमातीचा विद्यार्थी भारत सरकार शिष्यवृती व इतर योजनापासून वंचित राहिल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही महाविद्यालयाची राहिल यांची नोंद घ्यावी.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ