जिल्ह्यामध्ये 311 महाविद्यालयात समान संधी केंद्र स्थापन


अकोला,दि.29(जिमाका)- सामाजिक न्याय विभागाव्दारे जिल्ह्यातील प्रत्येक महाविद्यालयात त्या महाविद्यालयातील किमान एक प्राध्यापक व सहायक म्हणून काही विद्यार्थी यांची मदत घेऊन महाविद्यालयातच समान संधी केंद्र  स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याअनुषंगाने  जिल्ह्यातील सर्व 311 महाविद्यालयात समान संधी केंद्राची स्थापना करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून मागासवर्गीय मुलामुलींना शिष्यवृत्ती, फ्रिशीप व इतर शासनाच्या योजना, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, उद्योजकता व्यवसाय, रोजगार निर्मितीसह आर्थिक न्यायासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी दिली.

00000  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ