प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना; नोंदणीकृत शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रीया पूर्ण करा


अकोला,दि. 13(जिमाका)- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 2 लक्ष 12 हजार 652 शेतकरी लाभार्थ्यांची नोंदणी झाली असून अद्यापह 56 हजार 361 शेतकरी ई-केवायसी  प्रक्रिया होणे बाकी आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता शेतकऱ्यांनी जवळच्या सेवा केंद्रावर किंवा सेतू केंद्रावर शुक्रवार दि. 16 सप्टेंबरपर्यंत आधार कार्ड नोंदणी करुन ई-केवायसी  प्रक्रिया पुर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी तीन टप्यामध्ये प्रत्येकी दोन हजार प्रमाणे सहा हजार रुपये आर्थिक सहाय त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येते. या योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी ई-केवायसी  प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जवळच्या सेवा केंद्र किंवा सेतू केंद्रावर आधार कार्ड नोंदणी करुन ई-केवायसी  प्रक्रिया पुर्ण करावी. याबाबत पी.एम.किसान पोर्टलवर ई-केवायसी टॅबवर क्लिक करुन आधार क्रमांक टाकून नोंदणी करता येते.ही प्रक्रिया सोप्या व कमी वेळात होते. तरी शेतकरी लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्याकरीता ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन