लंपी चर्म रोग; खाजगी पॅरावेटच्या मदतीने आज पासून लसीकरण: युद्धस्तरावर मोहिम राबवा-मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन






            अकोला,दि. 16(जिमाका)-  जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाचा होत असलेला प्रादुर्भाव विचारात घेऊन या रोगावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी खाजगी पॅरावेटच्या मदतीने लसीकरण करण्यात येणार आहे. याकरीता तालुकास्तरावर तात्पुरती नियुक्ती करण्यात येणार आहे. पॅरावेट धारकांनी आपल्या भागात आजपासूनच युद्धस्तरावर लसीकरण राबवून लंपी चर्म रोग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांनी केले.   

            जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जनावरांचे लसीकरणाचा वेग वाढविण्यासाठी आढावा बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुभाष पवार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे,  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जी.एम. दळवी, सहा. आयुक्त पशुसंवर्धन  डॉ. तुषार बावने आदि उपस्थित होते.

            मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार म्हणाले की, जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाच्या नियंत्रण आणण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. लसीचे मात्रा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या मदतीने नियुक्त करण्यात आलेल्या खाजगी पॅरावेट यांनी युद्धस्तरावर मोहिम राबवावी. लंपी रोगाचा फैलाव इत्तर ठिकाणी होणार नाही याकरीता पशुपालकांना आवश्यक ते मार्गदर्शन करुन  उपाययोजना राबवावी. बाधीत जनावरांना अलगीकरण करुन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने औषधोपचार करावा. शासनामार्फत लसीकरण मोफत असून आपल्या भागातील जनावरांचे लसीकरण प्राधान्याने करुन घ्या, असे आवाहन यावेळी केले.

              पशुसंवर्धन विभागामार्फत 1 लक्ष 65 हजार 200 लसीच्या मात्रा उपलब्ध झाले 58 हजार 28 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.   तसेच जिल्ह्यामध्ये 57 इपिसेंटर असून 834 बाधित जनावरांपैकी 355 जनावरे  बरी झाली आहेत. तर 472 सक्रिय पशूरुग्ण आहेत.  लम्पि चर्म रोगाचा पशुरुग्ण आढळल्यास त्वरीत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, अशी माहिती  जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. जगदीश बुकतरे यांनी दिली.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ