कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत सहा पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज


      अकोला दि.15(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 86 अहवाल प्राप्त झाले. त्यात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोघांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.6 व खाजगी 0)6+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 6.

आरटीपीसीआर ‘सहा’

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यात चार पुरुष व दोन महिलांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर येथील एक तर उर्वरित अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

दोन डिस्चार्ज

आज दिवसभरात दोघांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘41

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65880(49747+15142+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 41 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील चार रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 37 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ