अतिवृष्टीग्रस्तांसाठी 130 कोटी निधी वितरीत

अकोला,दि. 21(जिमाका)-  जिल्ह्यात झालेल्या संततधार पाऊस, अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 130 कोटी 9 लक्ष 53 हजार रुपयांचा निधी विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार जिल्ह्यास प्राप्त झाला आहे. हा निधी विविध लेखाशिर्षाखाली संबधित तहसिलदार यांना वितरीत करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिली.

आदेशानुसार तालुकानिहाय निधी वितरण याप्रमाणे :  अकोला तालुक्याकरीता 49 कोटी 31 लक्ष 53 हजार, बार्शीटाकळीकरीता 29 लक्ष 24 हजार, अकोटकरीता 19 कोटी 75 लक्ष 24 हजार, तेल्हाराकरीता 3 कोटी 23 लक्ष 72 हजार, बाळापूरकरीता 53 कोटी 88 लक्ष 21 हजार तर मुर्तीजापूरकरीता 3 कोटी 61 लक्ष 59 हजार असे एकूण 130 कोटी 9 लक्ष 53 हजार रुपये संबंधित तहसिलदार यांच्याकडे विविध लेखाशिर्षाखाली  वितरीत करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ