कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत आठ पॉझिटीव्ह, नऊ डिस्चार्ज


      अकोला दि.21(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 111 अहवाल प्राप्त झाले. त्यात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर नऊ डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.8 व खाजगी 0)8+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 8.

आरटीपीसीआर ‘आठ’

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात आठ जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यात पाच पुरुष व तीन महिलांचा समावेश असून हे रुग्ण तेल्हारा व मुर्तिजापूर येथील प्रत्येकी एक तर उर्वरित सहा  जण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

नऊ डिस्चार्ज

आज दिवसभरात नऊ जणांला डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘41

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65902(49769+15142+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 41 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील चार रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 37 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ