अभय योजना 30 सप्टेंबरपर्यंतच; व्यापाऱ्यानी लाभ घ्यावा


अकोला, दि.23(जिमाका)- वस्तू व सेवाकर विभागाव्दारे व्यापारी वर्गाकरीता अभय योजना सुरु केली होती. या योजनेला व्यापारी वर्गातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून अद्यापर्यंत ज्या व्यापाऱ्यांचे जीएसटी पुर्व कायद्यांच्या थकबाकी भरली नाही अशा व्यापाऱ्यांनी दि. 30 सप्टेंबरपुर्वी लाभ घ्यावा, असे आवाहन वस्तु व सेवाकर कार्यालयाचे राज्यकर उपायुक्त सुनिल बनकर यांनी केले आहे.

            अभय योजना दि. 1 एप्रिल 2022 पासून सुरु झाली आहे. जीएसटी पुर्व कायद्यांच्या थकबाकीतुन कायमचे बाहेर पडण्यासाठी ही योजना राबविण्यात आली होती.  आतापर्यंत वस्तु व सेवाकर विभागाकडे थकबाकी  प्रलंबित असलेल्या व्यापाऱ्यापैकी जवळपास  50 टक्के म्हणजे एक लाख पन्नास हजार पेक्षा जास्त व्यापाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ