मतदार ओळखपत्र आधार जोडणी मोहिम; नागरिकांनी सहकार्य करावे:उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन


अकोला,दि.27(जिमाका)- निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार ओळखपत्राची आधार कार्ड जोडणी मोहिम सुरु आहे. त्याअनुषंगाने 31- अकोला पूर्व मतदार संघांतील मतदार यादीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून विहीत नमुन्यात आधार क्रमांक घरोघरी जाऊन तसेच विशेष शिबिरामध्ये मतदार केंद्रस्तरीय अधिकारीव्दारे माहिती गोळा करण्यात येत आहे. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अकोला पूर्व वि. म. संघ तथा उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार यांनी केले आहे.

मतदार ओळखपत्राची आधार कार्ड जोडणी मोहिम संदर्भात तहसिल कार्यालय येथे मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांची आढावा सभा पार पडली. यावेळी तहसिलदार सुनील पाटील,  नायब तहसिलदार श्रीकांत घुगे व निवडणूक विभागातील सर्व कर्मचारी हजर होते. मतदारांना त्यांचा आधार क्रमाक भरण्यासाठी नमुना 6 ब तयार करण्यात आला असून हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या eci.gov व मुख्य निवडणूक अधिकारी https// ceoeIection. Maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मतदारांना ऑनलाईन पध्दतीने सुध्दा आधार क्रमांक भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे आधार क्रमांक सादर करून मतदार ओळखपत्राशी आधार लिंक करू शकतात. तसेच मतदार स्वत voter heIpIine app व्दारे प्रक्रीया करू शकतात. अकोला पूर्व मतदार संघातील शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व मतदारांना आपले आधार  कार्ड क्रमांक मतदार ओळखपत्राशी जोडणी करण्याबाबत संबंधित मतदार केंद्रस्तरीय अधिकारी व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ