सेवा पंधरवडा; मुर्तिजापूर शिबीरात 192 जात प्रमाणपत्र वितरण


       अकोला,दि.29(जिमाका)- 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राष्ट्रनेता ते राष्टपिता सेवा पंधरवडा राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गाडगे महाराज महाविद्यालय,मुर्तिजापूर येथे बुधवार दि.28 रोजी जात प्रमाणपत्र पडताळणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. या शिबीरामध्ये अर्जदारांचे 71 प्रकरणे प्राप्त झाली असून त्यापैकी 45 प्रकरणाचे तपासण्या पूर्ण करण्यात आले. तसेच यापुर्वी मुर्तिजापूर व बार्शीटाकळी येथून प्राप्त झालेल्या प्रकरणापैकी 192 प्रकरणे जात वैधता प्रामणपत्र या शिबीरात वितरण करण्यात आले. या शिबीरामध्ये गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य संतोषराव ठाकरे, जिल्हा जात प्रमाणप पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी समीर कुर्तकोटी, उपायुक्त विजय साळवे, संशोधन अधिकारी शुभांगी कोरडे,पोलिस निरीक्ष्ज्ञक मंजुशा डव्हळे, विधी अधिकारी व इत्तर समिीचे कर्मचारी उपस्थित होते.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ