अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई; मुर्तिजापूर येथे गुटखा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यास अटक

  अकोला, दि.१६(जिमाका)- मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन, अकोला कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी मुर्तिजापुर शहरामध्ये धाड टाकुन गुटखा, पान मसाला विक्री प्रकरणी व्यापाऱ्यास अटक केले. या कारवाईत १७ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

           याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सागर तेरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि.१५)अन्न व औषध प्रशासन, अकोला कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी मे. मॉं वैष्णो खुशबु सेंटर, मेन रोड, सिंधी लाईन, मुर्तिजापुर या दुकानात अचानक तपासणी केली. त्यावेळी त्यांना या ठिकाणी प्रतिबंधीत अन्न पदार्थ विमल पानमसाला लहान पाऊच, वि-१ सुंगधीत तंबाखु लहान पाउच, विमल पानमसाला मोठे पाऊच, वि-१ सुंगधीत तंबाखु मोठे पाऊच, वाह पानमसाला, डब्ल्यु च्युविंग तंबाखु, प्रिमियम नजर गुटखा व पान पराग पान मसाला या प्रतिबंधित अन्न पदार्थांचा एकुण १७ हजार ३४० रुपये किमतीचा साठा विक्रीकरिता साठवलेला आढळला. हा साठा जप्त करुन दुकान मालकास ताब्यात घेण्यात आले.मुर्तिजापुर शहर पोलीस स्टेशन येथे संशयित सुरेश गोविंदराम चावला(वय ५८) रा.मुर्तिजापुर याचे विरुद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे कलम २६(२)(१) २६(२)(४) २७(२) (इ)(फ), ३०(२)(अ)  तसेच कलम ५९ व भादंवि कलम ३२८,१८८,२७२,२७२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला व अटक करण्यात आले. ही कारवाई सह आयुक्त, अमरावती शरद कोलते व सहायक आयुक्त सागर तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी नितीन नवलकार यांनी केली, अशी माहिती सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन,अकोला सागर तेरकर यांनी दिली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ