जिल्हाधिकारी कार्यालयात माहिती अधिकारी दिन साजरा; प्राप्त अर्ज मुदतीत मार्गी लावा-निवासी उपजिल्हाधिकारी




अकोला,दि.28(जिमाका)- जिल्हाधिकारी कार्यालय येथे माहिती अधिकार दिन आज साजरा करण्यात आला. माहितीचा अधिकार अधिनियमानुसार कार्यालयासंबधित माहिती देणे हा सामान्य नागरिकांचा हक्क असून अर्जदारांला मुदतीत माहिती उपलब्ध करुन द्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सजंय खडसे यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात माहिती अधिकार दिनानिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ धुगे, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.  

 माहिती अधिकार अधिनियमाअंतर्गत प्राप्त अर्ज निकाली काढण्यासाठी दप्तरी दस्तावेज व्यवस्थीत असणे आवश्यक आहे. दस्तावेजाचे वर्गीकरण व्यवस्थीत असल्यास अर्जदारांनी मागितलेली माहिती त्वरीत उपलब्ध करुन देणे सोईचे होते. प्राप्त अर्ज मुदतीतच निकाली निघेल याकरीता सर्वांनी प्रयत्न करावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. यावेळी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी माहिती अधिकार अधिनियमातील महत्वाच्या तरतुदीविषयी माहिती देऊन अर्ज निकाली काढण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नाचे निराकरण यावेळी करण्यात आले.

 

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ