प्राथमिक अहवाल; अतिवृष्टीमुळे पिकांचे 36 हजार 272 हेक्टरचे नुकसान


अकोला, दि.22(जिमाका)-  जिल्ह्यामध्ये झालेल्या संततधार पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे सोयाबीन, कापुस, तुर व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले  आहे. तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक अहवालानुसार अकोला, मुर्तिजापूर, अकोट व तेल्हारा तालुक्यातील 36 हजार 272 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी दिली.

प्राप्त माहितीनुसार दि. 12 ते 21 सप्टेंबर 2022 पर्यंत जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या क्षेत्राचा प्राथमिक अहवाल याप्रमाणे : अकोला तालुक्यातील सोयाबीन, कापूस व तूर पिकांचे अतिवृष्टीमुळे 200 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले. मुर्तिजापूर तालुक्यातील सोयाबीन, कापूस व तूर पिकांचे 137 हेक्टर, अकोट तालुक्यातील सोयाबीन, कापूस, तूर व फळपिकांचे 8 हजार 774 हेक्ट, तर तेल्हारा तालुक्यातील सोयाबीन, कापूस व तूर पिकांचे 27 हजार 161 हेक्टर असे एकूण 36 हजार 272 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. तर बार्शीटाकळी, बाळापूर व पातूर येथील माहिती निरंक आहे, अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि विभागाव्दारे देण्यात आली आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ