पदवीधर मतदार नोंदणी व मतदार आधार क्रमांक जोडणी; सर्व राजकीय पक्षांनी सहकार्य करा;निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


अकोला दि.26 (जिमाका)- : भारत निवडणूक आयोगाने पदवीधर मतदार संघाची मतदार याद्या तयार करणे व मतदार यांचे आधार क्रमांक लिंक करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्याअनुषंगाने ही मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षानी पुढाकार घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सर्व पक्षीय आढावा बैठकीत केले.

निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या दालनात पदवीधर मतदार नोंदणी व मतदार आधार क्रमांक जोडण्याबाबत सर्व राजकीय पक्षीय आढावा पार पडली. यावेळी उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, नायब तहसिलदार अतुल सोनवणे, सर्व राजकीय पक्षाचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते.

दि. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत पुर्णत: नवीन मतदार यादी तयार करण्याची मोहिम शनिवार दि. 1 ऑक्टोंबरपासून सुरु होत असून नोंदणी कार्यक्रम शनिवार दि. 1 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2022 याकालावधीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमूना 18 स्विकारण्यात येतील. दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध होईल. तर दि. 23 नोव्हेंबर ते दि. 9 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्यानंतर दि. 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी दिली. तसेच मतदार ओळखपत्राला आधार क्रमांक जोडण्यासाठी दि. 1 ऑगस्टपासून मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेला यशस्वी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षानी सहकार्य करावे, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ