पदवीधर मतदार नोंदणी कार्यक्रम घोषीत; 1 ऑक्टोबर नोंदणी सुरु


अकोला दि.23 (जिमाका)- : भारत निवडणूक आयोगाने दि. 14 जुलै 2022 च्या पत्रान्वये अमरावती पदवीधर मतदार संघाची मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार दि. 1 नोव्हेंबर 2022 या अर्हता दिनांकावर आधारीत पुर्णत: नवीन मतदार यादी तयार करण्याची मोहिम शनिवार दि. 1 ऑक्टोंबरपासून सुरु होत आहे. या मोहिमेचा पदवीधर मतदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.  

नोंदणी कार्यक्रम याप्रमाणे:

1.      शनिवार दि. 1 ऑक्टोंबर ते 1 नोव्हेंबर 2022 याकालावधीत पदवीधर मतदार नोंदणीसाठी नमूना 18 स्विकारण्यात येतील.

2.      दि. 23 नोव्हेंबर 2022 रोजी प्रारुप मतदार याद्या प्रसिद्ध.

3.      दि. 23 नोव्हेंबर ते दि. 9 डिसेंबर 2022 या कालावधीत दावे व हरकती स्विकारल्यानंतर दि. 30 डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ