कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत सात पॉझिटीव्ह, एक डिस्चार्ज


      अकोला दि.12(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 183 अहवाल प्राप्त झाले. त्यात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.7 व खाजगी 0)7+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 7.

आरटीपीसीआर ‘सात’

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यात तीन पुरुष व चार महिलांचा समावेश असून हे सर्व रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

एक डिस्चार्ज

आज दिवसभरात एकाला डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘31

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65866(49733+15142+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 31 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील चार रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 27 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन