जिल्ह्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढावेत; जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश


अकोला,दि. 15(जिमाका)- सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी जिल्ह्यात दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात येणार आहे. या पंधरवड्यामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढा, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी संबधित विभागाना दिले.

            राज्य शासनाव्दारे 2015 मध्ये आपले सरकार सेवा पोर्टल सुरु केले होते. परंतु नागरिकांचे कामे मुदतीत होत नसल्याने सर्व प्रलंबित तक्रारी, अर्जाचे निपटारा करण्यासाठी सेवा पंधरवाडा राबविण्यात येणार आहे. यामध्ये मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरी पुरवठा, ग्राम विकास, नगर विकास, आरोग्य, पाणी पुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील सेवांचा समावेश आहे.  

विविध विभागांच्या 14 सेवांचा समावेश

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण करणे, तांत्रिक अडचणींमुळे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या प्रलंबित असलेल्या पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे, फेरफार नोंदीचा निपटारा करणे, शिधापत्रिकांचे वितरण, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी, मालमत्ता कराची आकारणी करणे व मागणी पत्र देणे,  प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने अतंर्गत सिंचन विहिरी करिता अनूसुचित जमातीच्या  लाभार्थ्योची ऑनलाईन नोंदणी करणे, अनूसुचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मजूर करणे (अपिल वगळून),दिव्यांग प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र देणे अशा सेवांचा समावेश करण्यात आला आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ