कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत तीन पॉझिटीव्ह, एक डिस्चार्ज
अकोला दि.8(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 113 अहवाल प्राप्त झाले. त्यात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण
पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.3 व खाजगी 0)3+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 3.
आरटीपीसीआर ‘तीन’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात तीन पुरुषांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर येथील
दोन तर मनपा क्षेत्रातील एक जण रहिवासी आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
तीन डिस्चार्ज
आज दिवसभरात तीन
जणांना डिस्चार्ज
देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय
व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय रुग्ण ‘20’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 65851(49718+15142+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 20 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील चार रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 16
जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा