सेवा पंधरवाडा; जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत मार्गदर्शन


अकोला, दि.26(जिमाका)- राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा  दि. 17 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने गुरुवार दि. 22 सप्टेंबर रोजी जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करताना येणाऱ्या समस्यांबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीव्दारे ऑनलाईन मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जात पडताळणी समितीचे अध्यक्ष तथा अपर जिल्हाधिकारी समीर कुर्तकोटी, सदस्य तथा उपायुक्त विजय साळवे, जया राऊत, संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव दिपा हेरोळे, अकोला व अमरावती जिल्ह्याचे उपविभागीय अधिकारी डॉ.निलेश अपार, श्रीकांत देशपांडे, अभसिंह मोहिते, रामेश्वर पुरी आदि उपस्थित होते.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था यांच्या निर्देशानुसार सेवा पंधरवाडा कालावधीत जात पडताळणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार संयुक्त झुम मिटींगव्दारे जिल्हा जात पडताणी समितीचे विधी अधिकारी मंजुशा डव्हळे व रितु तराळ यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी अधिनियमाबाबत माहिती देऊन विशेषत: दोन वेगवेगळ्या प्रवर्गात मोडणाऱ्या समान जातीबाबत करावयाची कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. तसेच दत्तक, घटस्फोट प्रकरणी, व्यक्ती धर्म परीवर्तन करुन इतर धर्म स्विकारल्यानंतर पुन्हा त्याच जातीचे प्रमाणपत्र मागितल्या प्रकरणी, न्यायनिवड्याबाबत चर्चा करण्यात आली. परप्रांतीय लोकांच्या जातीबाबत घ्यावयाची काळजी व दक्षता पथकाने चौकशी दरम्यान जात प्रमाणपत्र पडताळणी समिती ही अर्ध्यन्यायिक स्वरुपाची असल्याने चौकशी दरम्यान जात प्रमाणपत्र पडताळणी नियमाचे काटेकोर पालन करुन प्रकरणे समितीच्या निर्णयास्तव सादर करणेबाबत माहिती दिली. यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी केलेल्या प्रश्नांचे निराकरण करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी समिर कुर्तकोटी यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ