कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत चार पॉझिटीव्ह, नऊ डिस्चार्ज
अकोला दि.20(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील
प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 97 अहवाल प्राप्त झाले. त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर नऊ डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण
पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.4 व खाजगी 0)4+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 4.
आरटीपीसीआर ‘चार’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात तीन पुरुष व एका महिलेचा समावेश असून हे सर्व
रुग्ण
मुर्तिजापूर येथील रहिवासी आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
नऊ डिस्चार्ज
आज दिवसभरात नऊ जणांला
डिस्चार्ज
देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
देण्यात आली.
सक्रिय रुग्ण ‘42’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65894(49761+15142+991) आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 42 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील चार रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 38 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा