खनिकर्म विभाग; 1 ऑक्टोंबरपासून गौणखनिज परवाना ऑनलाईन


अकोला,दि.16(जिमाका)-   जिल्ह्यातील खाणपट्टा मंजुरी, नुतनीकरण तसेच अल्पमुदत व तात्पुरत्या स्वरुपाचे गौणखनिजाचे परवाना दि. 1 ऑक्टोंबरपासून ऑनलाईन स्विकारण्यात येणार आहे. याकरीता अर्जदारांनी महाखनिज या संगणक प्रणालीवर अर्ज करावा, असे आवाहन प्रभारी अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी केले.

गौण खनिज उत्खनन(विकास व विनियमन) नियम 2013 नुसार जिल्ह्यातील गौणखनिजाचे उत्खनन व वाहतुकीचे संनियंत्रण व देखरेख करण्यासाठी महाखनिज संगणक प्रणाली लागू करण्यात आली आहे.  या प्रणालीमध्ये खाणपट्टा मंजुरी, खाणपट्टा नुतनीकरण, अल्पमुदत व तात्पुरत्या स्वरुपाचे गौणखनिजाचे उत्खनन परवानाबाबतचे अर्ज ऑनलाईन स्विकारण्याची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या ऑनलाईन सुविधेचा लाभ सर्व अर्जदारांनी घ्यावा. तसेच क्षेत्रीय कार्यालयाने अर्ज ऑनलाईनच स्विकारावा. दि. 1 ऑक्टोंबरनंतर ऑफलाईन अर्ज स्विकारल्या जाणार नाही, यांची नोंद घ्यावी, असे पत्राव्दारे प्रभारी अपर जिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम