जनजागृती रॅलीला उप प्रादेशिक अधिकाऱ्यांनी दाखविली हिरवी झेंडी







अकोला, दि.22(जिमाका)- राजा राममोहन रॉय जयंतीनिमित्त जिल्हा ग्रंथालय कार्यालयाव्दारे आज सकाळी 11 वाजता महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी हिरवी झेंडी दाखवून रवाना केली. ही रॅली जिल्हा ग्रंथालय कार्यालयापासून सुरुवात होवून प्रमीलाताई ओक, सार्वजनिक ग्रंथालय, अकोला येथे समारोप झाला. यावेळी जिल्हा उद्योग विभागाचे महाव्यवस्थापक निलेश निकम, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलींद दुसाने, जिल्हा नियोजन अधिकारी कैलाश देशमुख, तालुका क्रीडा अधिकारी श्री. नाकट, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष शामराव वाहुरवाघ, शाळेकरी मुले, मुली, शिक्षक, स्थानिक नागरिक, अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कैलास गव्हाळे, सुरेंद्र भटकर, अमोल इंगळे, निषांत अहिर, सोनीया खंडारे यांनी सहकार्य केले.

000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ