कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत चार पॉझिटीव्ह, एक डिस्चार्ज


      अकोला दि.14(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 85 अहवाल प्राप्त झाले. त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर एकाला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म.4 व खाजगी 0)4+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 4.

आरटीपीसीआर ‘चार’

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला.  त्यात एक पुरुष व तीन महिलांचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर व अकोला ग्रामीण येथील प्रत्येकी एक तर अकोला मनपा क्षेत्रातील दोन जण रहिवासी आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

एक डिस्चार्ज

आज दिवसभरात एकाला डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘37

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65874(49741+15142+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 37 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील चार रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 33 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

00000

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ