मागासवर्ग आयोगाचे सदस्यांचा जिल्हा दौरा


अकोला,दि. 16(जिमाका)- राज्याचे मागासवर्ग आयोगाचे सदस्य ॲड. चंद्रलाल मेश्राम(निवृत्ती न्यायमूर्ती),    डॉ.गजानन खराटे, डॉ. निलीमा सरप व मागासवर्ग आयोगाचे अधिकारी व कर्मचारी राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजाकरिता सोमवार दि.26 ते 29 सप्टेंबर 2022 दरम्यान जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-  

सोमवार दि. 26 रोजी सायं. 6 वाजता खाजगी वाहनाने शासकीय विश्रामगृह, अकोला येथे आगमन. मंगळवार दि. 27 रोजी सकाळी 10 वाजता सहायक आयुक्त समाज कल्याण व जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती यांचे समवेत बैठक. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे जातीविषयक प्रकरणांची/आयोगास प्राप्त निवेदनांची सुनावणी. त्यानंतर शासकीय विश्रामगृह, अकोला येथे मुक्काम. बुधवार दि. 28 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी साडेदहा ते साडेसहा वाजेपर्यंत अकोला जिल्ह्यातील चिखली, अदेरा, दसरबीड व बाळापूर येथील क्षेत्रपाहणी व निवेदनकर्त्यांच्या निवेदनावर कार्यवाही, मुलाखत अनुसूची भरणे. त्यानंतर सो शासकीय विश्रामगृह, अकोला येथे मुक्काम. गुरुवार दि. 29 रोजी खाजगी वाहनाने अमरावतीकडे प्रयाण.

000000 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ