कौशल्य विभाग; यंग प्रोफेशनल फेलोकरीता अर्ज मागविले

 

अकोला, दि.22(जिमाका)-  कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागात यंग प्रोफेशनल पदासाठी दि. 23 ऑक्टोंबरपर्यंत अर्ज मागविले आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागासोबत काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावा, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त द.ल.ठाकरे यांनी केले.

यंग प्रोफेशनल फेलो पदासाठी अर्थशास्त्र, सार्वजनिक धोरण, व्यव्स्थापन, अभियांत्रिकी, गणित संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, डेटा व्यवस्थापन, विक्री, एचआर, मिडिया, संप्रेषण व साहित्य क्षेत्रात पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी असलेल्या उमेदवार अर्ज करु शकतो. या पदाकरीता अर्ज करण्यासाठी वयोगट 18 ते 35 गटातील(दि.8 सप्टेंबर 2022 रोजी 35 वर्ष पूर्ण) पात्र असतील. अधिक माहितीसाठी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर जाहिरात व अर्जाचा विहित नमूना उपलब्ध आहे. तरी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागासोबत काम करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत भरघोस अनुदान शेतक-यांनी लाभ घ्यावा – जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी