विद्यार्थ्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने
अकोला दि.८(जिमाका)- सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आरक्षीत जागेवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्राची वैधता पडताळणी करणे आवश्यक असून त्यासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावे, असे आवाह उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती विजय साळवे यांनी केले आहे.
शैक्षणिक वर्षात मागासवर्गीय विद्यार्थी केवळ वैधता
प्रमाणपत्राअभावी शैक्षणिक प्रवेशापासून वंचित राहू नये यासाठी विद्यार्थ्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावयाचा आहे.ज्या
जिल्ह्यातून जातीचा दाखला प्राप्त केला आहे त्याच जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र
पडताळणी समितीकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. हमीपत्राचा नमुना बार्टीच्या संकेतस्थळावर
उपलब्ध आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज दाखल
केलेला नाही त्यांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावा,असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी
समितीचे उपायुक्त विजय साळवे यांनी कळविले आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा