कार्यशाळेत शासनाच्या योजना व कायदेविषयक मार्गदर्शन


     अकोला,दि.27(जिमाका)- महाराष्ट्र  राज्य विधी सेवा, मुंबई  यांच्या निर्देशानुसार व जिल्हा व सत्र न्यायाधिश श्रीमती  एस. के. केवले यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना तसेच कायदेविषयक माहिती व्हावी यासाठी मंगळवारी (दि.27) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत अनुसुचित जाती, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच, लोकप्रतिनीधींना  तज्ज्ञांव्दारे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परीषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, निवासी  उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव यो. सु. पैठणकर, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच आदि उपस्थ‍ित होते. तसेच विविध विभागाचे अधिकारी गोपाल वाघमारे, मुरलीधर ईंगळे, राजेश खुमकर, डॉ. जामोदकर यांनी  शासनाच्या विविध योजनांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.

        या कार्यशाळेच्या यशस्वीकरीता ग्रामविकास अधिकारी संजय गावंडे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अधिक्षक डी.  पी.  बाळे, राजेश देशमुख, शिवा ढोरे, हरीष ईंगळे यांनी परीश्रम घेतले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ