सेवा पंधरवाडा; तृतीयपंथीयांना नोंदणी प्रमाणपत्र व ओळखपत्र शिबीर


अकोला, दि.20(जिमाका)- राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा  दि. 17 सप्टेंबर ते दि. 2 ऑक्टोबर 2022 पर्यंत अकोला जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या कालावधीत तृतीयपंथी यांना प्रमाणपत्र व ओळखपत्राचे विशेष शिबीरामध्ये वितरण केले जाणार आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथीयानी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले  आहे.

तृतीयपंथीय व्यक्तीसाठी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेन्डर https:transgender.gov.in राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात आली आहे. या पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळणेसाठी अर्ज करण्याबाबतचे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तृतीयपंथीय व्यक्तींनी प्रमाणपत्र व ओळखपत्राकरिता आवश्यक दस्ताऐवजासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, दक्षता नगर, निमवाडी, पोलीस वसाहत जवळ, अकोला येथे संपर्क साधावा. या शिबीराचा तृतीयपंथी यांनी लाभ घ्यावा, असे आवाहण करण्यात येत आहे.

००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम