युपीएससी, एमपीएससी स्पर्धा परीक्षांचे शुक्रवार दि. २० रोजी ऑनलाईन मार्गदर्शन


अकोला, दि.18 (जिमाका) - कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्तालय, नवी मुंबईमार्फत जिल्हातील युवक-युवतींसाठी युपीएसी, एमपीएसी स्पर्धा परीक्षांचे ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनारचे आयोजन शुक्रवार दिनांक २० ऑगस्ट रोजी दुपारी ३ ते ४ या वेळेत 
 करण्‍यात आले आहे. या वेबीनारमध्‍ये सातारा जिल्ह्यातील उपजिल्हाधिकारी सोपान टोपे, मुंबई येथील शिक्षण तज्ज्ञ डॉ. आनंद पाटील, गंगटोक (सिक्कीम पूर्व) येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार निखारे यांचे प्रमुख मार्गदर्शन राहणार आहे. तसेच स्पर्धा परिक्षेबाबत काही प्रश्‍न असल्‍यास प्रश्नाचे निरासण करणेसाठी दुपारी ४.१५ ते ४.३० या वेळेत प्रश्न विचारु शकता. अधिक माहितीसाठी
फेसबुक लिंक https://www.facebook.com/MaharashtraSDEED तसेच युट्युब लिंक  https://www.youtube.com/channel/UC7o2gQB5q7VaITABN4FHw1A  वर लॉगइन होऊन या वेबीनारचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्‍त यांनी केले आहे.
0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ